7th Pay Commission : सध्या महाराष्ट्रासमवेत संपूर्ण देशात गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा केला जात आहे. 19 सप्टेंबर अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी या पर्वाला पर्वाला सुरुवात झाली असून 28 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच अनंत चतुर्दशी पर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे.
अर्थातच येत्या दोन दिवसात गणेशोत्सवाचा पर्व संपणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला गणेश भक्त पुढल्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देणार आहेत. दरम्यान गणेशोत्सवाचा सण संपल्यानंतर पुढल्या महिन्यात देशात नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळीचा सण साजरा होणार आहे. एकंदरीत आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे.
या सणासुदीच्या हंगामात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी DA मध्ये मोठी वाढ केली जाणार आहे. यामुळे संबंधित सरकारी नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
केव्हा होणार घोषणा ?
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट नुसार केंद्रशासन पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तीन टक्के महागाई भत्ता वाढीची घोषणा होऊ शकते. खरंतर शारदीय नवरात्र उत्सव 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशात साजरा होणार आहे.
दरम्यान या सणाच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के डीएवाढीची भेट दिली जाणार असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. निश्चितच सणासुदीच्या काळात केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर संबंधित कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना यामुळे मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तूर्तास मात्र केंद्र शासनाकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
किती वाढणार DA
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 42 टक्के DA मिळत आहे. याआधी डी ए 38% होता. परंतु जानेवारी महिन्यापासून यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आली.
आता 42 टक्के डीए मिळत असून यामध्ये आणखी तीन टक्के वाढ होण्याची अशी आहे. जुलै महिन्यापासून ही डीएवाढ लागू होईल. म्हणजे जुलै महिन्यापासून संबंधितांना 45 टक्के एवढा डीए मिळणार आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार
ऑक्टोबर महिन्यात जर याबाबतचा निर्णय झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जे वेतन नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्या वेतनासोबत याचा रोखीने लाभ मिळणार आहे.
दरम्यान ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू केली जाणार आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे.
जर ऑक्टोबरमध्ये याबाबतचा निर्णय झाला तर ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत, पेड इन नोव्हेंबरच्या पेमेंटसोबत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे.