7th Pay Commission : देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारी नोकरदारांना मोदी सरकार लवकरच एक मोठी भेट देणार आहे. खरे तर येत्या काही दिवसात लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक सुरू होणार आहे.
यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार असा देखील दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. दरम्यान आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो.
याआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2023 मध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. त्यावेळी जुलै 2023 पासून चार टक्के एवढा महागाई भत्ता वाढवला गेला. त्यानुसार महागाई भत्ता 46 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान महागाई भत्ता अर्थातच DA वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार अशी बातमी समोर आली आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार आहे.
सध्या हा भत्ता 46% एवढा असून यामध्ये आणखी चार टक्के वाढ होईल आणि हा भत्ता 50% पर्यंत जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकार होळीच्या सणाला घेऊ शकते. म्हणजेच पुढील मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवली जात आहे.
इकॉनॉमिक टाइम्स या प्रतिष्ठित वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 4% DA वाढ लागू केली जाणार आहे.
दरम्यान याबाबतची घोषणा जरी मार्च महिन्यात होण्याची शक्यता असली तरी देखील याची अंमलबजावणी जानेवारी 2024 पासून होणार आहे.
त्यामुळे मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढ लागू केली तर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील सदर कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.
यामुळे होळी सणाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. परिणामी, संबंधित पगारदारांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.