500 दिवसांच्या एफडीवर ‘या’ बँका देताय सर्वोच्च व्याजदर ! पैसे लवकरच होणार डबल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : आपल्यापैकी अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडीला महत्व देतात. खरंतर, भारतात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रिअल इस्टेट, सोने-चांदी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड असे अनेक पर्याय गुंतवणूकदारांपुढे आहेत.

शिवाय बँकेची एफडी योजना, आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, सरकारी बचत योजना अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना गुंतवणूकदारांपुढे आहेत.

तथापि, आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनेला विशेष महत्त्व दिले जाते. एफ डी मधून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत परतावा मिळतो मात्र येथे केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.

शिवाय अलीकडे काही बँका एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी करण्याकडे अनेकांनी आपला मोर्चा वळवला आहे.

विशेष म्हणजे तज्ञ लोकांनी एफडी करण्यासाठी सध्याचा काळ हा सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण 500 दिवसांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वोच्च व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

DCB Bank : डीसीबी बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना FD साठी चांगले व्याज दिले जात आहे. ही बँक मुदत ठेवींवर ८.३५% दराने व्याज ऑफर करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 महिने ते 37 महिन्यांचा कालावधीच्या FD साठी बँकेकडून 8.35% एवढा व्याज दर दिला जात आहे. तसेच 37 महिन्यांच्या कालावधीच्या FD साठी ही बँक 8.5% दराने व्याज देत आहे.

Indusind बँक : ही खाजगी क्षेत्रातील बँक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज ऑफर करत आहे. ही बँक 33 महिने ते 39 महिने मुदतीच्या FD वर 8% दराने व्याज देत आहे. तसेच ही बँक 19 महिने आणि 24 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 8.25% दराने व्याज ऑफर करत आहे.

येस बँक : मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी क्षेत्रातील ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीसाठी चांगले व्याजदर ऑफर करत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 36 महिने ते 60 महिन्यांच्या कालावधीवरील FD वर ८% दराने व्याज ऑफर करत आहे. तसेच ही बँक 18 महिने ते 24 महिन्यांच्या एफडीवर 8.25% दराने व्याज पुरवत आहे.

बंधन बँक : ही बँक देखील आपल्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज ऑफर करत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के एवढे व्याज देत आहे. मात्र 500 दिवसांच्या एफडीवर या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 8.35% एवढे व्याज दिले जात आहे.

Leave a Comment