तुमचेही मतदान कार्डवरील नाव चुकले आहे का ? मग घरबसल्या असे करा दुरुस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter ID Card Update : येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण जर एखाद्या व्यक्तीचे मतदान कार्ड वरील नाव चुकले असेल तर तो ते नाव कसे दुरुस्त करू शकतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर, मतदान कार्ड हे प्रामुख्याने मतदान करण्यासाठीच वापरले जाते. मात्र इलेक्शन पिरियड संपल्यानंतरही याचा महत्वाचे शासकीय कागदपत्र म्हणून वापर होतो. मत टाकण्यापुरतेच हे कार्ड मर्यादित नसून याचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो.

दरम्यान जर तुमच्या मतदान कार्डमध्ये नावाची गफलत झालेली असेल, जर तुमचे नाव चुकीचे प्रविष्ट झाले असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने घरबसल्या दुरुस्त करू शकता याविषयी आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मतदान कार्डवरील चुकीचे नाव कसे दुरुस्त करावे

जर तुमच्याही मतदान कार्ड मधील नावात काही गफलत झाली असेल आणि तुम्हाला या नावात दुरुस्ती करायची असेल तर यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल http://www.nvsp.in/ वर जा आणि तेथे लॉग इन करा.

त्यानंतर तुम्हाला करेक्शन ऑफ इंट्रीज इन एलेक्ट्रोल रोलवर टॅप करावे लागणार आहे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला फॉर्म 8 या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर जाल जिथे तुम्हाला मतदान कार्ड दुरुस्त करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

यानंतर, आवश्यक तपशील प्रविष्ट करून पुढे जा. या पेजवर तुम्हाला My Name च्या पर्यायावर टॅप करावे लागेल. यामुळे फक्त तुमचे नाव Voter ID मध्ये बदलले जाणार आहे.

यानंतर तुमचे शहर निवडा. पुढील चरणात तुम्हाला तारीख विचारली जाईल, यासाठी तुम्हाला त्याच दिवशीची तारीख निवडावी लागेल जेव्हा तुम्ही ऑनलाइन अर्ज कराल.

यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स व्हेरिफाय करावे लागणार आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.

Leave a Comment