7th Pay Commission : जर तुम्हीही सरकारी नोकरीत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून 50% एवढा करण्यात आला आहे.
आधी हा महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता. मात्र मार्च 2024 मध्ये केंद्रातील सरकारने शासन निर्णय जारी करून जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे अर्थातच महागाई भत्ता 50% एवढा करण्यात आला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका वर्षात दोनदा वाढवला जात असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जातो आणि नंतर जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे.
त्यांच्या महागाई भत्त्याची गणना जुलै 2024 पासून बदलणार आहे. खरे तर ए आय सी पी आय च्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता किती वाढणार हे समजत असते. मात्र यावेळी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची एआयसीपीआयची आकडेवारी समोर आलेली नाही.
यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक संभ्रमात आहेत की मे महिना संपत आला आहे, तरीही एआयसीपीआय फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांची आकडेवारी का जाहीर केली नाही ? यासाठी आरटीआयही दाखल करण्यात आला होता, तरीही एआयसीपीआय डेटा का जाहीर केला गेला नाही हे स्पष्ट झालेले नाही.
अशा परिस्थितीत जुलै 2024 पासून महागाई भत्ता देण्याचा सरकारचा विचार आहे की नाही ? असा सवाल उपस्थित होतोय. अशातच मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्याची रक्कम मर्ज केली जाऊ शकते असा दावा होऊ लागला आहे.
महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला असल्याने आता महागाई भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडली जाईल आणि हा भत्ता शून्य होईल असे म्हटले जात आहे. तथापि या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
परंतु जर महागाई भत्त्याची रक्कम मूळ पगारात वर्ग करण्यात आली तर कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा वाढणार आहे. ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा 50 हजार रुपये आहे त्याला सध्या 25000 रुपये महागाई भत्ता मिळतं आहे.
मात्र हा महागाई भत्ता मूळ पगारात जोडला जाणार आहे. म्हणजे 50 हजार रुपये बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा 75 हजार रुपये होणार अशी शक्यता आहे. मात्र यामुळे त्यांचा महागाई भत्ता हा शून्य होणार आहे.