आरटीओचे नियम एक जून पासून बदलणार; …..तर वाहन चालकाला भरावा लागणार 25 हजाराचा दंड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTO Rules Changed : वाहनचालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे येत्या एक जून पासून आरटीओच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. खरे तर भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तुम्ही हा लेख वाचत असतानाही भारतात कुठे ना कुठे छोटी-मोठी अपघाताची घटना घडलेली असेलच.

रस्ते अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही लोकांना अपंगत्व आलेले आहे. आरटीओच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. वाहन चालक नियमांचे पालन करत नसल्याने अधिकतर अपघातांच्या घटना होत आहेत.

दरम्यान या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरटीओच्या नियमात आता मोठा बदल करण्याचा निर्णय झालेला आहे. हे नियम एक जून 2024 पासून लागू होणार आहे.

या नवीन नियमानुसार नियमांचे उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. दरम्यान आता आपण कोणत्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांकडून 25 हजाराचा दंड वसूल केला जाईल याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसे आहेत नवीन नियम

आरटीओ एक जून पासून नवीन नियम लागू करणार आहे. या नवीन नियमानुसार वेगाने गाडी चालवली तर १००० ते २००० रुपये दंड भरावा लागणार आहे. जर समजा अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले तर २५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार अशी माहिती समोर आली आहे.

जर एखाद्या व्यक्तीने लायसन्स नसताना वाहन चालवले तर ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. आरटीओ च्या नवीन नियमानुसार हेल्मेट न घातल्यासं आणि सीट बेल्ट न लावल्यास १०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

जर तुम्ही १८ वर्षांपेक्षा कमी वयातच वाहन चालवले तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला २५ वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाहीये. दुसरीकडे आता लायसन्सची प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नवीन नियमानुसार आता एक जून पासून लायसन्स काढण्यासाठी खाजगी संस्थांकडे देखील ड्रायव्हिंग टेस्ट देता येणार आहे. या खाजगी संस्थांना ड्रायव्हिंग टेस्टचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राहणार आहे.

यासाठी मात्र संस्थेला शासनाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. शासन पात्र खाजगी संस्थांना ड्रायव्हिंग लायसन्स साठी आवश्यक असणारी ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यासाठी परवानगी देणार आहेत.

Leave a Comment