7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा होता.
यामध्ये आता केंद्रशासनाने चार टक्क्यांची घसघशीत वाढ केली आहे. त्यानुसार महागाई भत्ता हा 50 टक्के एवढा झाला आहे. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे.
याचा रोख लाभ मात्र मार्च 2024 च्या वेतनापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ दिला जाणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे. ऐन होळी सणाच्या पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याने त्यांना सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज राज्यात कार्यरत असलेल्या काही सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
या काही निवडक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करणेबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय आज राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून जारी करण्यात आला आहे.
आज राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आला आहे.
म्हणजेच अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आल्यानंतर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता वाढवणे अपेक्षित होते.
यानुसार आज राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 50% एवढा करण्यात आला आहे. यामुळे या सदर संवर्गातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.