ब्रेकिंग ! राज्यातील ‘या’ नागरिकांना अनुदानावर सोलर पॅनल, मिळणार 300 युनिटची मोफत वीज, हजारो नागरिकांना पीएम सूर्य घर योजनेत मंजुरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Panel Subsidy : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून आत्तापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्यांचे हित जोपसण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2024 ला अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती.

नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली. याअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंतची मोफत वीज मिळणार असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल असे त्यांनी म्हटले होते.

त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेबाबत माहिती दिली. मग पुढे केंद्रीय कॅबिनेटने या योजनेला मंजुरी दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेसाठीचे नवीन पोर्टल लॉन्च केले. तसेच या योजनेला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे नवीन नाव देण्यात आले.

दरम्यान, या योजनेचा नुकताच शुभारंभ झाला आहे. या योजनेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला असून, राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश पाठवण्यात आले आहेत. बुधवारी एकाच वेळी हजारो लाभार्थ्यांना हे संदेश पाठविण्यात आले आहेत.

यामुळे राज्यातील हजारो नागरिकांना आता सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

किती अनुदान मिळणार ?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला साठ हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि 10 किलोवॅट पर्यंतच्या क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या अंतर्गत मिळणारे अनुदान हे थेट लाभार्थ्याच्या खात्यात वितरित होणार आहे.

अर्ज कसा करणार ?

या योजनेसाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी राज्य, राज्य वीज वितरण कंपनी, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागणार आहे.

नोंदणी झाल्यानंतर मग पुन्हा एकदा वेबसाईटवर लॉगिन घेऊन या योजनेअंतर्गत सोलर रूफ टॉप साठी अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर मग डिस्कॉमकडून व्यवहार्यता मंजुरी मिळेल. डिस्कॉमकडून मंजुरी मिळाली की मग नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर प्लांट इन्स्टॉल करता येणार आहे.

सोलर प्लांट इन्स्टॉल झाल्यानंतर याचा तपशील मग वेबसाईटवर पुन्हा सबमिट करायचा आहे. हा तपशील सबमिट झाल्यानंतर नेट मीटर साठी अर्ज करावा लागेल. नंतर नेट मीटर इन्स्टॉल होईल. मग याची पाहणी केली जाईल. मग पोर्टलवर एक कमिशनिंग सर्टिफिकेट तयार होणार आहे.

हे कमिशनिंग सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर पोर्टलवर बँक अकाउंट चा तपशील जमा करावा लागेल. यामध्ये रद्द झालेला चेक देखील द्यावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग काही दिवसात लाभार्थ्यांना अनुदानाचा पैसा मिळणार आहे.

Leave a Comment