7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ऐन निवडणुकीपूर्वीच महागाई भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जातो. आता मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला असून तो पन्नास टक्के एवढा झाला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे.
मात्र याचा रोख लाभ हा मार्च 2024 पासून दिला जात आहे. खरेतर सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जात असते. जानेवारी आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो.
यानुसार एक जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे. आता एक जुलै 2024 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. एक जानेवारीपासून महागाई भत्तामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
यामुळे आता जुलै 2024 पासून हा भत्ता कितीने वाढतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. अशातच मात्र पुढील महागाई भत्ता वाढी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सध्याच्या महागाईचा विचार केला असता सरकार 4 ते 5 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवू शकते.
सरकारने डीएमध्ये 5 टक्के वाढ केल्यास 1 जुलैला कर्मचाऱ्यांचा डीए 55 टक्के होईल. एक जुलै 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू होणार असली तरी देखील प्रत्यक्षात याचा रोख लाभ मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते.
तथापि, याची अंमलबजावणी ही जुलै 2024 पासूनच होणार आहे. म्हणजे त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. निश्चितच महागाई भत्त्यात जर पाच टक्क्यांची वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असून यामुळे सदर नोकरदार मंडळीला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.