एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज ! SBI ने FD व्याजदरात केली मोठी सुधारणा, बँकेचे सुधारित व्याजदर पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI FD News : एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. दरम्यान या सरकारी बँकेतील ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने अर्थातच एसबीआयने आपल्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे.

बँकेने आज अर्थातच 15 मे 2024 ला आपले एफडीचे व्याजदर रिवाईज केले आहेत. यामुळे एसबीआय बँकेत एफडी करणाऱ्यांना आता चांगला परतावा मिळणार आहे.

जर तुम्हीही येत्या काही दिवसात स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हालाही आता एफडीवर चांगला मोबदला मिळू शकणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एसबीआय बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या निवडक मुदतीच्या FD वरील व्याजदरात 0.75% वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

विशेष बाब म्हणजे FD वर वाढवलेले नवीन व्याजदर आजपासूनचं लागू होणार असे बँकेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. म्हणजेच ग्राहकांना आजपासूनच या रिवाईज व्याजदराचा फायदा मिळणार आहे.

दरम्यान, आता आपण एसबीआय बँकेने कोणत्या कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या कालावधीच्या एफडी व्याजदरात वाढ झाली

एसबीआय बँकेने 46 दिवसांपासून ते 179 दिवस कालावधीच्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. आधी या कालावधीच्या एफडीवर 4.75 टक्के या दराने व्याज दिले जात होते. आता मात्र या कालावधीच्या एफडीवर 5.50% या दराने व्याज दिले जाणार आहे.

एसबीआय बँकेने १८० ते २१० दिवस कालावधीच्या एफडीचे व्याजदर देखील सुधारित केले आहेत. आधी या कालावधीच्या एफडीवर 5.75 टक्के या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात होते आता मात्र सहा टक्के या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जाणार आहे.

211 दिवस ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD व्याजदरात देखील सुधारणा करण्यात आली आहे. आधी या कालावधीच्या एफडीवर सहा टक्के एवढे इंटरेस्ट दिले जात होते आता मात्र 6.25 टक्के इंटरेस्ट दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे या सर्व कालावधीच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचे व्याज मिळणार आहे. निश्चितच एसबीआयच्या या निर्णयामुळे एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या हजारो ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment