7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च एंडिंगला एक मोठी भेट मिळणार आहे. त्यांच्या खात्यात मार्च एंडिंगला मोठी रक्कम जमा होणार अशी माहिती समोर येत आहे. खरेतर या सरकारी पगारदार लोकांसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकार आहे महागाई भत्ता 46% वरून 50% करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने महागाई भत्ता ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच वाढवला असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे आता महागाई भत्ता 50% झाल्याने कर्मचाऱ्यांचे इतरही अनेक भत्ते वाढले आहेत. दरम्यान आता आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्तासह आणखी कोणते भत्ते वाढले आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
महागाई भत्ता 50% झाला
गेल्या काही महिन्यांचा ट्रेंड पाहिला असता महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होत आहे. जानेवारी 2024 पासून देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला आहे.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीमधील महागाई भत्ता आता 50 टक्के एवढा राहणार आहे. याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार
मार्च महिन्याच्या पगारांसोबत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार. परिणामी त्यांच्या या पगारात मोठी वाढ होणार आहे. म्हणून सणासुदीच्या दिवसात सदर पगारदार मंडळीला दिलासा मिळेल अशी आशा आहे.
आणखी कोणते भत्ते वाढणार
महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता वाढेल असे बोलले जात होते. यानुसार घर भाडे भत्ता एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
आधी एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के एवढा घर भाडे भत्ता दिला जात होता. पण आता एक्स वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30, 20 आणि 10% एवढा HRA मिळणार आहे.
घर भाडे भत्ता तर वाढणारच आहे शिवाय बालसंगोपन भत्ता, शिक्षण भत्ता, वसतिगृह अनुदान, हस्तांतरण भत्ता, ड्रेस भत्ता, ग्रॅच्युइटी कमाल मर्यादा आणि मायलेज भत्ता देखील वाढेल. परंतु हे सर्व भत्ते क्लेम केल्यावर मिळणार आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 30 मार्चला
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा मार्च महिन्यातच होणार आहे. आगामी सणासुदीचा हंगाम पाहता सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार एप्रिलच्या पहिल्या अन दुसऱ्या आठवड्यात करण्याऐवजी 30 मार्चला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पगार खरे तर 31 मार्चला होणार आहे, पण रविवार असल्याने 30 मार्चलाच कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असे बोलले जात आहे.