उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन पुन्हा सुरु, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. खरे तर, सध्या सणासुदीचा हंगाम आहे आणि यामुळे विविध रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय.

यामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या देखील सोडवल्या जात आहेत. परंतु असे असतानाही बडनेरा ते नाशिक दरम्यान धावणारी मेमू ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत होती. ही रद्द झालेली मेमू ट्रेन कोणत्याही परिस्थितीत सुरू झाली पाहिजे अशी मागणी या मार्गांवरील प्रवाशांनी केली होती.

याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती नाराजी पाहता आणि ही रद्द झालेली ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी झालेला पाठपुरावा पाहता मध्य रेल्वेने ही मेमू ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, या मार्गावर देखील आधीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त गर्दी झाली तर प्रवाशांची आणखी गैरसोय होऊ शकते. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने बडनेरा ते नाशिक दरम्यानची मेमू ट्रेन पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचा निर्णय यावेळी घेतलेला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 24 मार्चपासून बडनेरा-नाशिक मेमू ट्रेन आपल्या नियोजित वेळेत धावू लागली आहे.

यामुळे रेल्वे प्रवाशांनी या रेल्वेच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे. आता आपण ही मेमू ट्रेन कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

बडनेरा-नाशिक मेमू ट्रेन कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी आधी ज्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत असे त्याच रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. अर्थातच ही गाडी मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

Leave a Comment