7th Pay Commission : आगामी वर्ष अर्थातच 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे.
अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात आहेत. पुढील वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.
पहिल्यांदा जानेवारी ते जून या सहामाहीत आणि दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबर या सहामाहीत महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.
पुढील वर्षी मात्र हा महागाई भत्ता 54 टक्क्यांपर्यंत जाणार असा अंदाज आहे. दरम्यान, नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच देशभरातील सेवानिवृत्त पेन्शन धारकांना आणि कौटुंबिक पेन्शन धारकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या पेन्शन धारकांना सरकारने फिक्स मेडिकल अलाउन्स देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे पेन्शनधारकांना त्यांचा दैनंदिन वैद्यकीय खर्च भागवण्यास मदत होणार आहे.
हा भत्ता केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) किंवा इतर कोणत्याही आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या पेन्शनधारकांना उपलब्ध राहणार अशी माहिती समोर आली आहे.
या संबंधित केंद्रीय पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनासोबतच हा भत्ता दिला जाणार आहे. दरम्यान हा भत्ता नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
हा भत्ता बँकेच्या माध्यमातून किंवा पेन्शन विभागाच्या माध्यमातून सेवानिवृत्तीच्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
किती मिळणार फिक्स मेडिकल अलाउन्स (FMA)
मे 2014 मध्ये केंद्र सरकारने कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांचा निश्चित वैद्यकीय भत्ता (FMA) 100 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवला आहे. तर संरक्षण विभागाच्या पेन्शनधारकांना 500 रुपयांचा एफएमए मिळत होता, जो ऑगस्ट 2017 मध्ये वाढवून 1000 रुपये करण्यात आला आहे.
कसे होणार मेडिकल भत्त्याचे वितरण
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील रिटायर्ड कर्मचाऱ्यांना डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा FMA मार्च महिन्यात वितरित होणार आहे. मार्च ते में या तीन महिन्यांचा भत्ता जून महिन्यात वितरित होणार आहे. जून ते ऑगस्ट महिन्याचा भत्ता सप्टेंबर महिन्यात वितरित होणार आहे. तसेच ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याचा भत्ता डिसेंबर महिन्यात वितरित होणार आहे.