7th Pay Commission : महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर विजयादशमीच्या काळात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै 2023 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा झाला आहे. या आधी संबंधितांचा महागाई भत्ता अर्थातच डीए 42 टक्के एवढा होता.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शिंदे सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.
दरम्यान शिंदे सरकार लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चार टक्के एवढा वाढवला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून तयार देखील झाला आहे. हा प्रस्ताव आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार असून येत्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.
अर्थातच नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. यामध्ये आणखी चार टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
यानुसार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा होणार आहे. जुलै 2023 पासून ही वाढ लागू केली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत याचा रोख लाभ मिळणार आहे. अर्थातच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देखील संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
या कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ
याशिवाय महाराष्ट्र राज्यातील सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन / पेन्शन घेणाऱ्या सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. जुलै 2023 पासून या संबंधित कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 9 टक्के डी.ए वाढ लागु केली जाणार असे वृत्त एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आले आहे.
सध्या 6th Pay Commission अंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 221 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जात आहे. पण आता यामध्ये नऊ टक्के वाढ होणार आहे आणि DA 229 पर्यंत वाढवला जाणार आहे.
निश्चितच सहावा वेतन आयोग अंतर्गत आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे अशी आशा व्यक्त केली जात आहे.