शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्य सरकार ‘या’ दरात खरेदी करणार धान आणि भरडधान्य, बळीराजाला मिळणार दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील धान उत्पादक आणि भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे.

खरंतर राज्यात भात अर्थातच धान पिकाची कोकण आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय राज्यात सर्वदूर भरडधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. भरड धान्य उत्पादन गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

केंद्र शासनाने भरडधान्य उत्पादनाला चालना दिली असल्याने राज्यात भरड धान्याची लागवड वाढली आहे. दरम्यान राज्य शासनाने भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून भात आणि भरड धान्याची किमान आधारभूत किमतीत खरेदी केली जाणार आहे. खरतर केंद्र सरकारने वर्ष 2023 24 साठी धान आणि भरड धान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत.

सरकारने भात (धान) व ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्याच्या किमान आधारभूत किमती म्हणजे हमीभाव जाहीर केला आहे. दरम्यान या आधारभूत किमतीचा म्हणजेच हमीभावाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने हमीभावात धान आणि ज्वारी, बाजरी, मका, रागी या भरड धान्याची खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना देखील राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.

यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयाचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल असा दावा केला जात आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

निश्चितच राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला आणि शेतकऱ्यांच्या कामाला योग्य मोल मिळणार आहे यात शंकाच नाही. यामुळे शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. दरम्यान आता आपण धानासाठी आणि भरड धान्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाची माहिती जाणून घेणार आहोत.

काय हमीभाव मिळणार ?

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने, भात सर्वसाधारण (एफएक्यू) साठी २.१८३ रुपये प्रतिक्विंटल, भात अ दर्जा २,२०३ रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. तसेच ज्वारी (संकरित) ३,१८० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी (मालदांडी) ३,२२५ प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. तसेच बाजरीसाठी २,५००, मका २,०९०, रागी ३.८४६ रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

खरेदीचा कालावधी काय राहणार ?

हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या माध्यमातून एक नोव्हेंबर ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत भाताची हमीभावात खरेदी केली जाणार आहे. तसेच भरड धान्याची खरेदी एक डिसेंबर ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे.

Leave a Comment