7th Pay Commission : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि त्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान यामुळे सर्वत्र अतिशय उल्हासाचे वातावरण आहे. आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 ला लागणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष राहणार आहे.
यंदा सत्ताधारी विजयाचा हॅट्रिक करतात की विपक्ष पुन्हा एकदा सत्ता काबीज करते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात जे नवीन सरकार सत्ता स्थापित करेल ते नवीन सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देणार आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
जानेवारी 2024 पासून हा महागाई भत्ता लागू झाला आहे. दरम्यान आता जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे.
पण जुलै महिन्यापासून केंद्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन-चार टक्के नव्हे तर पाच टक्के वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 55 टक्के होणार असा दावा होत आहे.
ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू होईल मात्र याबाबतचा निर्णय सप्टेंबर 2024 मध्ये घेतला जाणार असा अंदाज आहे. तथापि, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका किती वाढणार ? या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यामुळे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढतो, 4 टक्क्यांनी वाढतो की 5 टक्क्यांनी वाढतो हे पाहण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.