महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% कधी होणार ? ‘या’ तारखेला निघणार जीआर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State Employee News : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून यानंतर निकाल जाहीर होणार आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून 2024 ला जाहीर होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू राहणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. याचा रोख लाभ मात्र मार्च 2024 मध्ये मिळाला आहे.

दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ कधी मिळणार ? हा सवाल राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

आता याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% कधी होणार याची नवीन तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50 टक्के केला जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून 50 टक्के केला जाणार आहे. याचा शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे. याचा रोख लाभ जून महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे.

म्हणजे कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जो पगार मिळेल त्यासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे. जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

खरे तर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाचणार आहे. दरम्यान या विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राज्यातील शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या अखेरीस घेणार आहे.

यामुळे निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. याशिवाय राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे.

मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांचे देखील सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले जाणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घेतला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.

Leave a Comment