7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विजयादशमीच्या काळात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 46 टक्के एवढा झाला आहे. महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46% एवढा केल्यानंतर आता केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
येत्या नवीन वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पाहता केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. याच निर्णयाचा एक भाग म्हणून केंद्रशासन आता घर भाडे भत्ता वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे.
2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत शिवाय पुढील वर्षी महाराष्ट्रासहित अन्य काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना तीन टक्के घर भाडे भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे.
केव्हा वाढणार घरभाडे भत्ता ?
महागाई भत्ता 50% क्रॉस झाल्यानंतर घर भाडे भत्ता वाढवला जाणार आहे. याआधी 2021 मध्ये ज्यावेळी महागाई भत्ता 25 टक्के होता त्यावेळी घर भाडे भत्ता वाढवण्यात आला आहे.
दरम्यान आता महागाई भत्ता 50% क्रॉस झाल्यानंतर एचआरए म्हणजेच घरभाडे भत्ता वाढवला जाईल असे सांगितले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% आहे मात्र जानेवारी 2024 पासून हा महागाई भत्ता 50% होणार आहे.
याबाबतचा निर्णय मार्च 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे एचआरए देखील मार्च 2024 नंतरच वाढवला जाणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
किती वाढणार घरभाडे भत्ता
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानानुसार घर भाडे भत्ता दिला जात आहे. निवासस्थानानुसार एक्स, वाय आणि झेड श्रेणीमध्ये कर्मचाऱ्यांना डिवाइड करण्यात आले आहे.
यानुसार एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घर भाडे भत्ता दिला जात आहे. मात्र आता यामध्ये एक ते तीन टक्के वाढ होणार आहे.
आता X श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना 30 टक्के, Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना २० टक्के आणि Z श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढा घरभाडे भत्ता दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे.