अहमदनगर, पुणे, छ. संभाजीनगरकरांसाठी गुड न्युज ! 700 कोटी रुपयांचा नगर बायपास ‘या’ दिवशी होणार खुला, मोदी करणार उदघाट्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Bypass : राज्यात गेल्या काही वर्षांपासून विकासाचे विविध प्रकल्प जलद गतीने पूर्ण केले जात आहेत. पण गेल्या काही महिन्यांमध्ये विकास कामांना आधीच्या तुलनेत अधिक गती दिली जात आहे. शासनाकडून महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या जात आहेत.

याचे मुख्य कारण म्हणजे पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामाला जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अशातच, आता अहमदनगर, पुणे आणि छत्रपती संभाजी नगर येथील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या तिन्ही शहरांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला नगर बायपास अर्थातच बाह्यवळण मार्ग लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या बाह्यबळण रस्त्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पणाची तारीख देखील ठरवण्यात आली आहे.

कसा आहे प्रकल्प ?

खरंतर, अहमदनगर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा बाह्य वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता शहरा जवळील विळद घाट ते चांदबिबी महल या 40 किलोमीटरच्या अंतरावर तयार करण्यात आला आहे. हा एक फोर लेन अर्थात चार पदरी रस्ता आहे. यासाठी जवळपास सातशे कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत या प्रकल्पाचे जवळपास 96 टक्के एवढे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित चार टक्के काम देखील जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. हे काम यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच नगर बायपास रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी नवीन वर्षात खुला होणार आहे.

केव्हा खुला होणार मार्ग 

हा प्रकल्प फक्त नगरकरांसाठीच महत्त्वाचा आहे असे नाही तर यामुळे पुणे आणि छत्रपती संभाजी नगर या शहरातील नागरिकांना देखील मोठा फायदा मिळणार आहे. या मार्गामुळे उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. शिर्डी आणि शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्रावर देशभरातून नागरिक येत असतात.

येथे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातुनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. एका अंदाजानुसार शिर्डी येथे दरवर्षी उत्तर आणि दक्षिण भारतातील जवळपास एक कोटी भाविक दर्शनासाठी येत असतात. शनिशिंगणापूर येथे या भागातून जवळपास 22 लाख नागरिक दरवर्षी शनि देवाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. आतापर्यंत या भाविकांना येथे येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे.

पण आता या नगर बायपास रोड मुळे या भाविकांचा प्रवास गतिमान होणार आहे. त्यांचा 48 मिनिटांपर्यंतचा प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, 26 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगर बायपास रोडचे लोकार्पण केले जाणार असे वृत्त एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने दिले आहे.

कर्नाटकातील भाविकांना मिळणार दिलासा

शिर्डी आणि शनिशिंगणापूरला जाणारे कर्नाटकातील भाविका आतापर्यंत नगर सोलापूर रस्त्यावरून आल्यानंतर नगरशहरातून मग पुढे नगर-मनमाड रस्त्याला लागून शिर्डीकडे प्रवास करत. पण हा बायपास खुला झाल्यानंतर या भाविकांना आता सोलापूर मार्गानेच थेट विळद घाटातून नगर-मनमाड रस्त्याला जाता येणे शक्य होणार आहे.

यामुळे या भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे आणि नगरकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. याव्यतिरिक्त जामखेड आणि दौंड येथील प्रवाशांना देखील या मार्गानेच जाता येणार आहे. 

Leave a Comment