सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हे’ तीन मोठे आर्थिक लाभ, वेतनात होणार मोठी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवा बजावत आहात का ? किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी करत आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार लवकरच एक मोठी भेट देणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित केला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी सुधारणा होणार आहे. या सुधारणेनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

अर्थातच महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे प्रस्तावित करण्यात आले आहे. दरम्यान, महागाई भत्ता वाढीबाबतचा हा निर्णय 20 मार्चपूर्वीच घेतला जाऊ शकतो असा मोठा दावा केला जात आहे.

अशा परिस्थितीत, सदर नोकरदार मंडळीच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. विशेष बाब अशी की फक्त महागाई भत्ता वाढेल असे नाही तर इतरही अनेक भत्ते यावेळी वाढणार आहेत.

केव्हा होणार निर्णय ?

मिळालेल्या माहितीनुसार, 20 मार्चला केंद्रीय कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. दरम्यान, याच बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. महागाई भत्ता साधारणपणे वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित केला जातो.

रकारने त्यात मार्चमध्ये वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी दिली जाणार आहे. त्याचा लाभ 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना म्हणजेच एक कोटीहून अधिक लोकांना मिळणार आहे.

इतर भत्ते पण वाढणार 

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) ग्राहक किंमत निर्देशांकाची नवीनतम आकडेवारी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ दर्शवते. त्यानुसार मूळ वेतनाच्या डीए 50.26 टक्क्यांपर्यंत जात आहे.

जर महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला तर इतर भत्ते आणि पगार घटकही वाढतील. यामध्ये घरभाडे भत्ता (एचआरए), मुलांचा शिक्षण भत्ता, बाल संगोपन भत्ता, वसतिगृह अनुदान, हस्तांतरणावरील प्रवास भत्ता (टीए वाढ), ग्रॅच्युइटी कमाल मर्यादा, ड्रेस भत्ता, मायलेज भत्ता आणि दैनिक भत्ता वाढतील असा अंदाज आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, जर महागाई भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला तर मुलांच्या शैक्षणिक भत्त्यातही २५ टक्क्यांनी वाढ होईल.

त्याचप्रमाणे, बाल संगोपनासाठी विशेष भत्ता, ग्रॅच्युइटी कमाल मर्यादा, ड्रेस भत्ता आणि दैनंदिन भत्ता यांसारख्या इतर घटकांमध्ये 25 टक्के वाढ केली जाईल. तज्ज्ञांच्या मते, हे भत्ते डीएशी जोडलेले असतात. 

Leave a Comment