सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार दोन गिफ्ट ! सरकार ‘या’ 2 मागण्या करणार मान्य, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच मोलाची ठरणार आहे. मीडिया रिपोर्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून आठवा वेतन आयोगाबाबत विशेष चर्चा पाहायला मिळतं होत्या.

केंद्र सरकारने मात्र सध्या स्थितीला आठवा वेतन आयोग लागू होणार नाही हे स्पष्ट केले आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना सध्या सरकार दरबारी आठवा वेतन आयोग लागू करणेबाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले आहे. मात्र केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन मोठे लाभ दिले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्यात जानेवारी 2024 पासून आणखी चार टक्के एवढी वाढ केली जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा आहे. यामध्ये आणखी चार टक्के वाढ करणे अपेक्षित आहे. म्हणजेच महागाई भत्ता अर्थातच डीए 50 टक्के होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही.

याची घोषणा मार्च 2024 मध्ये होळी सणाच्या आसपास होणार असा अंदाज आहे. अर्थातच मार्च महिन्याच्या वेतनासोबत (पेड इन एप्रिल) या वेतनासोबत 4 टक्के महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाच्या रक्कमेचा देखील लाभ मिळणार आहे. फक्त महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरक नाही तर कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे.

किती वाढणार घरभाडे भत्ता

महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता वाढणार आहे. याबाबत आधीच एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झाले आहे. यामध्ये शासनाने महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता वाढणार हे सूचित केले आहे. यामुळे मार्च 2024 मध्ये महागाई भत्ता सोबतच घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे. HRA म्हणजे होम रेंट अलाउन्स तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या 27% पर्यंतचा एचआरए कर्मचाऱ्यांना मिळत आहे. यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होईल. अर्थातच HRA 30% पर्यंत पोहचणार आहे.

HRA गणनेचे सूत्र काय आहे ?

HRA ची गणना करण्यासाठी एक सूत्र आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहराच्या श्रेणीनुसार घरभाडे दिले जाते. सरकारने देशातील सर्व शहरांची X, Y आणि Z श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. जिथे सरकार X श्रेणीमध्ये 27 टक्के, Y श्रेणीमध्ये 18 टक्के आणि Z श्रेणीमध्ये 9 टक्के घरभाडे भत्ता देते. हा घरभाडे भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारानुसार ठरविला जातो.

कोणत्या शहरासाठी HRA दिला जातो ?

X श्रेणी – दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या शहरांना एक्स श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या २७ टक्के एचआरए मिळतो. यामध्ये आता तीन टक्क्यांची वाढ होणार आहे. अर्थातच हा एचआरए 30 टक्के होईल.

Y श्रेणी : कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सोलापूर, नाशिक, नांदेड, भिवडी, अमरावती, पाटणा, लखनौ, विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा, गुवाहाटी, चंदीगड, रायपूर, राजकोट, जामनगर, वडोदरा, सुरत, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगाव, नोएडा, रांची, जम्मू, श्रीनगर, ग्वाल्हेर, इंदूर, भोपाळ, जबलपूर, उज्जैन, कटक, भुवनेश्वर, राउरकेला, अमृतसर, जालंधर, लुधियाना, बिकानेर, जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, मुरादाबाद, मेरठ, बरेली, अलीगढ, आग्रा, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, गोरखपूर, फिरोजाबाद, झाशी, वाराणसी, सहारनपूर यांसारखी शहरे Y श्रेणी मध्ये समाविष्ट होतात.

येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या १८ टक्के एचआरए मिळतो. आता मात्र यामध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार आहे. म्हणजे या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 20% एचआरए मिळणार आहे.

Z श्रेणी – X आणि Y श्रेणीतील शहरांव्यतिरिक्त, इतर सर्व शहरे झेड श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ९ टक्के एचआरए मिळतो. आता मात्र यामध्ये आणखी एक टक्क्याची वाढ होईल म्हणजेच या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना आता दहा टक्के एचआरए मिळणार आहे.

Leave a Comment