7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एक जून 2024 ला लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील अर्थातच सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होणार आहे. यानंतर 4 जून 2024 ला लोकसभेचा निकाल लागणार आहे.
दरम्यान या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून 50% झाला असल्याने त्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढला आहे.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक्स, वाय, झेड श्रेणीनुसार अनुक्रमे 27 टक्के, 18 टक्के आणि नऊ टक्के असा घरभाडे भत्ता मिळत होता. आता मात्र हा घर भाडे भत्ता अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के असा झाला आहे.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढला असल्याने आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता कधी वाढणार ? हाचं मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देऊ शकते. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत आहे.
म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% होणार आहे. याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी होऊ शकतो असा दावा केला जात आहे.
दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यानंतर त्यांचा घर भाडे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होत आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ जून महिन्याच्या पगारांसोबत मिळणार आहे. परंतु हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू केला जाणार आहे.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे. तसेच घर भाडे भत्ता देखील तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे.