मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणारा ‘हा’ महामार्ग ऑगस्ट 2024 मध्ये खुला होणार, राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे शेकडो प्रकल्प पूर्ण झाले आहेत. विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे जाळे विकसित करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळ तब्बल 15 नवीन महामार्ग विकसित करणार आहे.

यातील एक महामार्ग हा पूर्ण झाला आहे. तो म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे. तसेच एका महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. हा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेला हा मार्ग लवकरच पूर्णपणे कार्यान्वित होणार अशी माहिती समोर येत आहे.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अंतर्गत मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित केला जात आहे. या महामार्गाचे आत्तापर्यंत तीन टप्पे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाला.

या पहिल्या टप्प्या अंतर्गत मुंबई ते शिर्डी हा ५२० किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित करण्यात आला होता. यानंतर शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा महामार्ग गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.

तसेच या चालू वर्षी अर्थातच 2024 च्या अगदीच सुरुवातीला समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. आता या महामार्गाचा चौथा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमने यादरम्यान विकसित होत असलेला 76 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणे बाकी आहे.

विशेष म्हणजे हा चौथा टप्पा देखील लवकरच पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. ऑगस्ट 2024 मध्ये इगतपुरी ते आमने हा समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.

खरंतर या शेवटच्या टप्प्याचे काम खूपच आव्हानात्मक होते. मात्र यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. या चौथ्या टप्प्या अंतर्गत विकसित होत असलेल्या बहुतांशी पूलांचे आणि बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या टप्प्याचे 95% काम पूर्ण झाले असून उर्वरित पाच टक्के काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत.

या टप्प्या अंतर्गत तयार होत असलेल्या ठाण्यातील खर्डी येथील एका दीड किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम बाकी आहे. या पुलाचे काम खूपच आव्हानात्मक असल्याने हे काम कासव गतीने सुरु आहे. या पुलाचे संपूर्ण काम होण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुलाची एक बाजू ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू करण्याचा प्लॅन बनवला आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणारा समृद्धी महामार्ग ऑगस्ट 2024 पासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या सात-आठ तासात पूर्ण होणार आहे.

तसेच मुंबई ते शिर्डी हा प्रवास फक्त पाच तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. या महामार्गामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे विभाग परस्परांना जोडले जाणार आहेत. यामुळे राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार असा विश्वास तज्ञांना आहे.

Leave a Comment