86 हजार कोटी रुपयांचा खर्च करून महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग ! ‘या’ शहरांमधून जाणार 800 किमीचा मार्ग, पण…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : राज्य रस्ते विकास महामंडळ ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करणार अशी माहिती समोर येत आहे. यानंतर 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार आहे. सध्या समृद्धी महामार्गाचा फक्त 625 किलोमीटर लांबीचा भाग म्हणजेच नागपूर ते इगतपुरी हा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे.

या मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे अर्थातच इगतपुरी ते आमने याचे काम अजून राहिलेले आहे. मात्र या टप्प्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले सुरू उर्वरित पाच टक्के काम जलद गतीने पूर्ण करून हा संपूर्ण महामार्ग येत्या काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई ते शिर्डी हा प्रवास फक्त पाच तासात पूर्ण होईल आणि मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त सात ते आठ तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. एकंदरीत या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात समृद्धी महामार्गापेक्षा लांबीच्या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग तयार करणार आहे. हा महामार्ग ८०५ किलोमीटर लांबीचा राहणार असून राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. हा रस्ता राज्यातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेचे मंदिर हे अर्ध शक्तीपीठ वगळता राज्यातील तीन शक्तीपीठे जोडण्याचे काम हा महामार्ग करणार आहे. हेच कारण आहे की या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव मिळाले आहे. हा प्रोजेक्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पाचे अलाइनमेंट गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये अंतिम करण्यात आले होते. यानंतर या महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन करणे हेतू भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आगामी काळात या प्रकल्पासाठी भूसंपादन केले जाणार आहे.

आधी हा प्रकल्प 760 km लांबीचा राहिला असे म्हटले जात होते मात्र अलाइनमेंट फायनल झाल्यानंतर हा प्रकल्प 805 किलोमीटर लांबीचा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास फक्त 11 तासात पूर्ण होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 21 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय.

हा रस्ता एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे. हा एक्सप्रेस वे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे. परिणामी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे चार विभाग या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत.

हा महामार्ग महाराष्ट्र गोवा सरहद्दीवर कोकण द्रूतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. मात्र या महामार्गाचा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात विरोध होत आहे. या महामार्गामुळे शेतकरी बांधव भूमीहिन होतील यामुळे हा महामार्ग प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

यासाठी पुढल्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव विराट मोर्चा काढणार अशी माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हा विरोध पाहता या महामार्गाचे काम खरच होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment