7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. जर तुम्ही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्याही कुटुंबातून अथवा मित्रपरिवारातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून आणखी चार टक्क्यांनी वाढणार हे जवळपास फिक्स झाले आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.
असे झाले तर जानेवारी ते जून या कालावधीसाठी महागाई भत्ता 50% एवढा होणार आहे. जुलै 2023 पासून महागाई भत्ता 46 टक्के एवढा आहे. यामध्ये आता चार टक्के एवढी वाढ प्रस्तावित राहणार आहे. यामुळे हा महागाई भत्ता 50% होईल अशी आशा आहे.
तथापि याबाबतचा अधिकृत निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला नाही. यामुळे महागाई भत्ता वाढीबाबत केंद्र शासन केव्हा निर्णय घेणार हा मोठा सवाल आहे. मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्च 2024 मध्ये महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मार्च महिन्यात होळीचा सण येतो दरम्यान याच होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे.
निश्चितच, केंद्र शासनाने जर मार्च महिन्यात विशेषता होळी सणाच्या पूर्वी याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केली तर त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे आणि यामुळे त्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण महागाई भत्ता 50% झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पगार किती वाढणार ?
मीडिया रिपोर्ट नुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% या पातळीवर पोहोचल्यास महागाई भत्ता पुन्हा एकदा शून्य केला जाणार आहे. तसेच महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जॉईट केली जाणार आहे.
याचाच अर्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर त्याला DA 50% झाल्यानंतर 9,000 रुपयाचा महागाई भत्ता मिळेल, दरम्यान, हाच 9,000 रुपयाचा डीए कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वर्ग केला जाईल.
म्हणजेच 18,000 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 27,000 वर जाणार आहे. तथापि महागाई भत्ता मात्र त्यावेळी शून्य होणार आहे.