समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात तयार होणार 802 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग ! ‘या’ दोन शहरांमधील 21 तासाचा प्रवास फक्त 11 तासात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार होत आहे.

राजधानी मुंबई ते नागपूर या दरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाची निर्मिती केली जात आहे. आतापर्यंत या मार्गाचा सहाशे किलोमीटर पर्यंतचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू झाला आहे.

उर्वरित 101 किलोमीटर लांबीचा भाग देखील सर्वसामान्यांसाठी लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन 802 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा देखील मार्ग विदर्भातून जाणार आहे.

विदर्भातील नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे. दरम्यान, या महामार्गाबाबत नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

या मार्गाच्या अंतिम संरेखनाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता येत्या काही महिन्यांमध्ये या प्रकल्पाच्या पुढील कामांना वेग येणार अशी आशा व्यक्त होत आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा मार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.

वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील दिगरज येथून या मार्गाची सुरुवात होते तर हा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील पत्रादेवी-बांदा इथे हा मार्ग संपतो. या मार्गामुळे नागपूर ते गोवा हा 21 तासाचा प्रवास फक्त 11 तासात पूर्ण होणे शक्य होणार आहे.

या शहरांना जोडणार

हा मार्ग राज्यातील अनेक महत्त्वाच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. कोल्हापूर येथील श्री अंबाबाई, श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी, आंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी माता, माहूर गडावरील सप्तशृंगी माता या तीर्थक्षेत्रांना या मार्गामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

हा मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केला जाणार असून या मार्गासाठी प्राधिकरणाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. यानंतर विविध पर्यायी आखणीचा अर्थातच संरेखनाचा अभ्यास केला.

यानुसार पत्रादेवी ते वर्धा यादरम्यानच्या मार्गाचे संरेखन किंवा आखणी अंतिम करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. हा मार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.

Leave a Comment