7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण जेव्हापासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे तेव्हापासून झालेली सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अर्थातच महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला असून ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. याचा रोख लाभ हा सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारा सोबतच मिळाला आहे.
मार्च महिन्याचा पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळाली आहे. खरे तर सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवत असते.
जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून असा दोनदा महागाई भत्ता सुधारित केला जातो. दरम्यान आता आपण जेव्हा सातवा वेतन आयोग लागू झाला म्हणजेच 2016 पासून ते आतापर्यंत कोणत्या वेळी किती महागाई भत्ता वाढला हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एक जानेवारी 2016 : महागाई भत्ता वाढ झाली नाही.
एक जुलै 2016 : सातवा वेतन आयोगानंतर पहिल्यांदा महागाई भत्ता दोन टक्के झाला.
एक जानेवारी 2017 : महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ झाली म्हणजेच महागाई भत्ता चार टक्क्यांवर पोहोचला.
एक जुलै 2017 : महागाई भत्ता फक्त एक टक्क्यांनी वाढला आणि पाच टक्क्यांवर पोहोचला.
एक जानेवारी 2018 : DA दोन टक्क्यांनी वाढून सात टक्क्यांवर पोहोचला.
एक जुलै 2018 : डीए दोन टक्क्यांनी वाढून नऊ टक्क्यांवर पोहोचला.
1 जानेवारी 2019 : डीए तीन टक्क्यांनी वाढून 12 टक्क्यांवर पोहोचला
एक जुलै 2019 : महागाई भत्ता चक्क पाच टक्क्यांनी वाढला आणि 17 टक्क्यांवर पोहोचला.
एक जानेवारी 2020 : कोरोना काळ महागाई भत्ता वाढला नाही.
एक जुलै 2020 : कोरोना काळ असल्याने महागाई भत्ता वाढला नाही.
एक जानेवारी 2021 : कोरोना काळ असल्याने महागाई भत्ता वाढला नाही.
एक जुलै 2021 : जुलै 2019 नंतर म्हणजेच 18 महिन्यांनी महागाई भत्ता सुधारित झाला आणि यामध्ये तब्बल 14 टक्क्यांची वाढ करण्यात आली. महागाई भत्ता 31 टक्क्यांवर पोहोचला.
एक जानेवारी 2022 : महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढून 34 टक्क्यांवर पोहोचला.
एक जुलै 2022 : महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढून 38 टक्क्यांवर पोहोचला.
एक जानेवारी 2023 महागाई भत्ता पुन्हा चार टक्क्यांनी वाढला आणि 42 टक्क्यांवर पोहोचला.
एक जुलै 2023 महागाई भत्ता पुन्हा चार टक्क्यांनी वाढला आणि 46 टक्क्यांवर पोहोचला.
एक जानेवारी 2024 : यावेळी देखील महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून महागाई भत्ता आता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे.