अखेर मुहूर्त सापडला ! ‘या’ तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीस मिळणार मान्यता, किती वाढणार DA?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए बाबत म्हणजेच महागाई भत्ताबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. जानेवारी महिन्यापासून DA वाढ लागू केल्यानंतर आता जुलै महिन्यापासून डीए वाढ केव्हा लागू होणार अशी विचारणा केली जात आहे.

दरम्यान या DA वाढीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनची डीए वाढ मिळणार आहे. याचा निर्णय केव्हा होणार याची तारीख देखील समोर आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपणार असे बोलले जात आहे.

केव्हा मिळणार DA वाढ

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय या चालू महिन्यात होणार आहे. म्हणजेच हा महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा फायद्याचा राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चालू महिन्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे.

किती वाढणार DA

या महिन्याच्या अखेरीस डीएवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. खरंतर डीए तीन किंवा चार टक्के वाढवला जाणार आहे. नेमका डीए किती वाढणार याबाबत कोणतीच स्पष्टोक्ती नाही. अद्याप केंद्र शासनाच्या माध्यमातून याविषयी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच निर्णय घेतला जाणार असे मात्र बोलले जात आहे. पण DA 3% वाढो किंवा 4% हा DA जुलै महिन्यापासून लागू केला जाणार आहे. याचाच अर्थ जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

जर समजा तीन टक्के डीए वाढला तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के डीए मिळत आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 45 होणार आहे. पण जर चार टक्के डीए वाढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 46 टक्के एवढा होणार आहे. 

Leave a Comment