7th Pay Commission News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तसेच तुमच्या कुटुंबातून अथवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून लवकरच मोठी भेट दिली जाणार आहे.
खरंतर ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ जुलै 2023 पासून लागू करण्यात आली आहे. म्हणजे एक जुलै 2023 पासून महागाई भत्ता 46 टक्के एवढा करण्यात आला आहे. आधी हा भत्ता 42 टक्के एवढा होता.
अशातच महागाई भत्ता म्हणजे DA वाढी संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता केंद्र शासनाकडून ज्यावेळी पुढील डीए वाढ दिली जाईल तेव्हा हा भत्ता पाच टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे. या बाबतची आकडेवारी देखील आता समोर येऊ लागली आहे.
खरेतर जानेवारी 2024 मध्ये डीए सुधारित केला जाणार असून त्यावेळी डीए 51% पर्यंत वाढवला जाणार असे वृत्त समोर आले आहे. म्हणजेच येणारे नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरू शकते असा दावा केला जात आहे.
वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात ही वाढ दिली जाते. यानुसार नुकतीच जुलै 2023 पासूनची महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे.
म्हणून आता जानेवारी 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना लागू केली जाणार आहे. दरम्यान ही DA वाढ AICPI निर्देशांकावरून ठरवली जात असते. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2024 पासून डीए पाच टक्क्यांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे.
आतापर्यंतची आकडेवारी असेच सुचित करत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की एआयसीपीआयची जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार, AICPI निर्देशांक १३७.५ अंकांवर पोहचला आहे, तर महागाई भत्ता स्कोअर ४८.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
विशेष बाब अशी की ऑक्टोबरमध्ये हा आकडा ४९ टक्क्यांहून अधिक होईल असा अंदाज तज्ञ लोकांनी वर्तवला आहे. म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची आकडेवारी आली तर महागाई भत्ता स्कोर हा 51 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पाच टक्के डीएवाढीची भेट मिळेल असा दावा केला जात आहे. तथापि याबाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडून घेतला जाणार आहे.
मात्र सध्याची आकडेवारी पाहता महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय मार्च 2024 मध्ये घेतला जाईल असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता केंद्रशासन पुढील डीए सुधारणा करताना काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.