गुड न्युज ! राज्य कर्मचाऱ्यांना 4% DA वाढ लागू करणेबाबत वित्त विभागाचा प्रस्ताव तयार, ‘या’ तारखेला निघणार अधिकृत शासन निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission DA Hike : गेल्या महिन्यात झालेल्या नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्रातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने एक मोठी भेट दिली होती. नवरात्र उत्सवात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 4% DA वाढ लागू करण्यात आली होती. ही महागाई भत्ता वाढ जुलै 2023 पासून लागू करण्यात आली आहे.

यानुसार आता महागाई भत्ता 46% एवढा झाला आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर आता राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाणार आहे.

याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार केला असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी चार टक्के डीए वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

सध्या स्थितीला राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा डीए मिळत आहे. यामध्ये आता चार टक्के एवढी वाढ केली जाणार आहे. यानुसार आता महागाई भत्ता 46% एवढा होईल असे सांगितले जात आहे.

केव्हा जारी होणार अधिकृत शासन निर्णय 

केंद्र शासनाच्या धर्तीवर ही महागाई भत्ता वाढ जुलै 2023 पासूनचे लागू केली जाणार आहे. यामुळे संबंधितांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे.

आता याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाने तयार केला असून शासन निर्णयासाठी आवश्यक असलेली तयारी देखील पूर्ण झाली आहे. यामुळे आता याबाबतचा अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबतचा अधिकृत शासन निर्णय या चालू महिन्याच्या अर्थातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होणार असे वृत्त समोर आले आहे. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत या बाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चार महिन्यांची थकबाकी मिळणार

30 नोव्हेंबर पर्यंत महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होणार आणि कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतन सोबत याचा लाभ दिला जाणार आहे.

तसेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांची थकबाकी देखील संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

दरम्यान आता 30 नोव्हेंबर पर्यंत चार टक्के महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment