मोठी बातमी ! सरकार सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी करणार मान्य, मूळ पगारात होणार 44% वाढ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission News : पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अर्थातच निवडणुका आता जवळ आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने आता कंबर कसली आहे. समाजातील सर्वच घटकांना खुश करण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय केंद्रातील मोदी सरकारकडून घेतले जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत.

याशिवाय देशातील गोरगरीब जनतेला स्वस्तात गव्हाचे पीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोफत रेशनिंगच्या योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशातच आता देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील केंद्रातील मोदी सरकार एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोगानंतर तब्बल 10 वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही तर नमूद करू इच्छितो की सातवा वेतन आयोग 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला होता. सातवा वेतन आयोगासाठी मात्र 2014 मध्येच समितीची स्थापना करण्यात आली होती.

2014 मध्ये समितीची स्थापना झाल्यानंतर 2016 पासून सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग अर्थात आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. याबाबत अद्याप केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे.

केव्हा लागू होणार आठवा वेतन आयोग

नवीन वेतन आयोगासाठी म्हणजेच आठवा वेतन आयोगासाठी 2024 मध्ये समितीची स्थापना केली जाणार आहे. यानंतर अवघ्या दीड ते दोन वर्षांच्या काळात नवीन वेतन आयोग कर्मचाऱ्यांना बहाल केला जाणार आहे. अर्थातच कर्मचाऱ्यांना 2026 पर्यंत आठवा वेतन आयोगाची भेट मिळणार आहे.

तथापि याबाबत केंद्रातील मोदी सरकारने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी पुढील वर्षी नवीन वेतन आयोगाच्या समितीची घोषणा होईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

पगारात किती वाढ होणार

खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. या मागणीवर सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. यासाठी आंदोलन देखील केले जात आहे. मात्र आता पुढील वर्षी आठवा वेतन आयोगासाठी समिती स्थापित होईल असा अंदाज आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पट एवढा होईल. यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 44 टक्क्यांनी वाढणार असा दावा केला जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 हजार रुपयांचा किमान मूळ पगार मिळत आहे. मात्र यामध्ये आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आठ हजाराची वाढ होणार आहे.

म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 26 हजारावर पोहोचणार आहे. निश्चितच नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. यामुळे आता केंद्रातील मोदी सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे. 

Leave a Comment