7th Pay Commission News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा संघटित क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटीच्या रकमे संदर्भात. सरकारी आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
खरंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. म्हणजे DA मध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे.
याचा रोख लाभ मात्र मार्च महिन्यात देण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळाली. केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच EPFO ने देखील गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतला होता.
यानुसार, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती आणि मृत्यू उपदानात वाढ करण्यात आली होती. यासंदर्भात EPFO ने एक आदेश जारी केला होता. यात असे म्हटले होते की, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दिली जाणारी ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीची रक्कम वाढवण्यात आली आहे.
या जारी केलेल्या आदेशात सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीची कमाल रक्कम ही 25 टक्क्यांनी वाढवण्यात आली असल्याचे म्हटले होते. आधी ही रक्कम 20 लाख रुपये एवढी होती. यात पाच लाखांची वाढ करण्यात आली अन ही रक्कम 25 लाखांपर्यंत वाढवली गेली होती.
मात्र आता गेल्या महिन्यात घेण्यात आलेला हा निर्णय फिरवण्यात आला आहे. ग्रॅच्यूटीच्या रकमेत झालेली ही वाढ थांबवण्यात आली आहे. याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी धक्कादायक बातमी असल्याचे बोलले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 7 मे रोजी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) महागाई भत्त्यात (DA) वाढ झाल्याने तत्काळ प्रभावाने लागू झालेली ग्रॅच्युइटी वाढ थांबवण्याची घोषणा केली आहे. या आदेशात या निर्णयाचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.
खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भत्यामध्ये वाढ झाली. यामध्ये घर भाडे भत्याचा देखील समावेश होतो. घर भाडे भत्ता देखील एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय ग्रॅच्यूटीची कमाल रक्कम देखील वाढवण्यात आली होती.
आता मात्र ग्रॅच्यूटीची कमाल रक्कमेत झालेली वाढ थांबवण्यात आली आहे. म्हणजे ग्रॅच्यूटीची कमाल रक्कम आधीप्रमाणेच 20 लाख एवढी राहणार आहे. अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर दिली जाणारी ग्रॅच्युईटी रक्कम ही कमाल वीस लाख रुपये एवढीच राहणार आहे.