आताची सर्वात मोठी बातमी ! बारावीचा निकाल 21 मेला लागणार, तर 10 वी चा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC And HSC Result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या अर्थातच 21 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान आता महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख डिक्लेअर केली आहे.

बारावीचा निकाल हा उद्या अर्थातच 21 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन हा निकाल पाहता येणे शक्य होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रात 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

लाखो विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल कधी डिक्लेअर होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता महाराष्ट्र बोर्डाने बारावी निकालाची तारीख जाहीर केली आहे.

उद्या अर्थातच 21 मेला सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यानंतर मग दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या बारावी बोर्डाच्या निकालाची वाट पाहिली जात होती तो रिझल्ट उद्या एक वाजता लागणार आहे.

mahresult.nic.in, mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in या संकेतस्थळावर बारावीचा रिझल्ट पाहता येणार आहे. बारावीच्या रिझल्टची तारीख डिक्लेअर झाली असल्याने आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दहावीचा निकाल नेमका कधी जाहीर होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कधी लागणार 10वी चा निकाल?

उद्या बारावीचा निकाल लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. एक वाजेनंतर विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन निकाल पाहू शकणार आहेत. दुसरीकडे दहावीच्या निकालाबाबत देखील एक मोठी अपडेट समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या म्हणजेच या चालू महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. अर्थातच मे महिन्याअखेरपर्यंतच दहावीचा देखील निकाल जाहीर होणार आहे.

Leave a Comment