सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यापासून पगार वाढणार, कितीने वाढणार सॅलरी?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या नोकरदार मंडळीचा पगार वाढणार आहे. खरेतर, दरवर्षी सरकारी कर्मचारी जुलै महिन्याची खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. याचे कारण म्हणजे जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मोठे आर्थिक लाभ मिळतात.

याही वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन आर्थिक लाभ मिळणार आहेत. पहिला म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे आणि दुसरा म्हणजे त्यांच्या पगारात इन्क्रिमेंट होणार आहे.

खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो. यावर्षी जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे.

आता जुलै महिन्यापासून चा महागाई भत्ता सुधारित होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार आणि त्यांच्या पगारात किती टक्के इन्क्रिमेंट होणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महागाई भत्ता कितीने वाढणार?

खरे तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला होता. जानेवारी 2024 पासून हा महागाई भत्ता वाढवला गेला आहे.

आधी कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात होता. आता मात्र हा महागाई भत्ता 50 टक्के एवढा झाला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू आहे. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढणार आहे.

यानुसार महागाई भत्ता 54 टक्क्यांवर जाणार आहे. ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर 2024 मध्ये घेतला जाईल असे म्हटले जात आहे.

म्हणजे आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे नवीन सरकार सत्ता हातात घेईल ते नवीन सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे.

पगारात कितीची इन्क्रिमेंट होणार ?

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी ३ टक्के वाढ करत असते. यंदाही तेवढी वाढ केली जाणार आहे.

अशा परिस्थितीत दरमहा 50 हजार रुपये पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 1500 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळपगार 50 हजार रुपये असेल त्यांना 1500 रुपयांची इन्क्रिमेंट मिळणार आहे.

Leave a Comment