जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ! महिन्याच्या सुरुवातीलाच खात्यात जमा होणार ‘इतका’ पैसा, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर दरवर्षी देशभरातील सरकारी कर्मचारी जुलै महिन्याची वाट पाहत असतात.

आपल्या राज्यातील सरकारी कर्मचारी देखील जुलै महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण की दरवर्षी जुलैच्या महिन्यात सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ दिला जात असतो.

जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होते शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा देखील लाभ दिला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार जुलै महिन्यात सर्वाधिक वाढत असतात.

हेच कारण आहे की दरवर्षी जुलै महिन्याची आतुरतेने वाट पाहिली जात असते. दरम्यान आता आपण जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार नेमके किती वाढणार? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महागाई भत्ता कितीने वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता यामध्ये आणखी वाढ होणार आहे. जुलै 2024 पासून महागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढू शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

म्हणजेच महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 54 टक्क्यावर जाणार आहे. ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतल्या जाईल असे बोलले जात आहे.

दरम्यान जर महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली तर ज्या सरकारी नोकरदारांचा मूळ पगार 50 हजार रुपये असेल त्यांच्या पगारात दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे.

म्हणजेच महागाई भत्ता दोन हजार रुपयांनी वाढणार आहे. वार्षिक आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 24 हजार रुपयांचा यामुळे फायदा होणार आहे.

इन्क्रिमेंट देखील मिळणार

दरवर्षी जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे ३ टक्क्यांनी वाढ होते. याचा अर्थ कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ५० हजार रुपये असेल तर त्यातील ३ टक्के रक्कम १५०० रुपये आहे.

म्हणजेच पन्नास हजार मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 1500 रुपयांची वाढ होते. एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार महागाई भत्ता वाढीचे 2000 आणि इन्क्रिमेंट चे 1500 असा एकूण 3500 रुपयांनी वाढणार आहे.

Leave a Comment