7th Pay Commission : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना याचा रोखला मार्च महिन्याच्या पगारांसोबत दिला गेला आहे. विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली असून सदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी अन फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील देण्यात आली आहे.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय झाल्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. अशातच आता आचारसंहिता सुरू असतानाच त्रिपुरा राज्य शासनाने तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र केंद्र शासनाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याने आणि सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ नियोजित वेळेप्रमाणे दिली जात असल्याने या निर्णयामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे आता त्रिपुरा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की त्रिपुरा राज्य सरकारने दिनांक 01 जानेवारी 2024 पासून तेथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 5 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु केली आहे.
आतापर्यंत तेथील राज्य कर्मचाऱ्यांना तथा सेवानिवृत्त पेन्शन धारकांना 21% एवढा महागाई भत्ता मिळत होता. पण आता सदर राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी / सेवानिवृत्त पेन्शनधारकांना 25 टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.
सदर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे. या निर्णयाचा त्रिपुरा राज्यातील 80 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि एक लाख कार्यरत कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
दरम्यान त्रिपुरा राज्य सरकारने तेथील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला असल्याने आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा मोठा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होऊ लागला आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासन राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा धरतीवर चार टक्क्यांनी वाढवणार असा दावा आता होऊ लागला आहे.