विजयादशमीच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्युज; ‘या’ कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता वाढला, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : आज संपूर्ण देशात विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये देखील मोठी चमक पाहायला मिळत आहे.

सणासुदीला सोने आणि चांदीच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोन्यासारखीच एक चमकदार आणि मोठी गोड बातमी समोर आली आहे. खरतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढवण्याचे जाहीर केले आहे. यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के एवढा झाला आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू झाली असून जुलै महिन्यापासूनची थकबाकी देखील संबंधितांना दिली जाणार आहे.

अशातच, आता देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा नुकताच निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे.

काल अर्थातच विजयादशमीच्या पूर्वसंध्येवर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. काल 23 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाने याबाबतची सविस्तर अधिसूचना निर्गमित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून 46 टक्के एवढा झाला आहे.

विशेष म्हणजे महागाई भत्ता वाढीचा हा लाभ आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ पुढील महिन्याच्या वेतनासोबत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचे रेल्वेच्या विविध कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.

याशिवाय, केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही देण्याचे जाहीर केले आहे. अराजपत्रित गट ब आणि गट क अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. सरकारने या बोनसची कमाल मर्यादा 7,000 रुपये एवढी निश्चित केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या बोनससाठी 15,000 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत.

एकंदरीत नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने घेतलेल्या महागाई भत्ता वाढीच्या आणि बोनसच्या निर्णयामुळे तसेच रेल्वे बोर्डाने नुकताच घेतलेल्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शासनाच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Leave a Comment