7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच मोठा निर्णय घेतला होता. केंद्रातील मोदी सरकारने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली होती. आचारसहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील सरकारने महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला.
जानेवारी 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय झाला. मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला यामुळे मार्च महिन्याच्या पगारासोबतच याचा रोख लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल अशी आशा होती.
मार्च महिन्याचा पगार सोबत वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाच्या रकमेचा लाभ दिला जाऊ शकतो अशी शक्यता होती. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना निश्चितच सणासुदीच्या दिवसात आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठा दिलासा मिळणार होता.
पण, वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाच्या रकमेचा लाभ सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकलेला नाही. असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना मार्च महिन्याचा पगारासोबत याचा लाभ मिळाला नाही.
केव्हा मिळणार DA वाढ अन फरकाची रक्कम
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार हा फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच मिळाला आहे. त्यांना आता वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाच्या रक्कमेचा लाभ हा एप्रिल महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे.
अर्थातच एप्रिलच्या पगारासोबत या सदर कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराचा लाभ मिळणार आहे. खरतर या वर्षी मार्चच्या सुरुवातीलाच डीए वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. याचा शासन निर्णय हा मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच निघाला.
यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तथा पेन्शन धारकांना मार्चच्या पगारासोबतच डीए वाढ व फरकाची रक्कम मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र काहींच्या खात्यात वाढीव पगार जमा झाला, तर काहींना जुनाच पगार मिळाला.
आता ज्यांना मार्चच्या पगारात वाढीव डीएसह फरकाचा लाभ मिळाला नाही, त्यांना एप्रिलच्या पगारासोबत म्हणजेच जो पगार मे महिन्यात हातात पडेल त्यासोबत याचा लाभ मिळणार अशी आशा आहे.
किती वाढणार महागाई भत्ता ?
समजा एखाद्या कर्मचाऱ्याला दरमहा 50,000 रुपये मूळ पगार मिळतोय. अशा कर्मचाऱ्याला आतापर्यंत 46 टक्के डीएनुसार 23,000 रुपये महागाई भत्ता मिळत होता.
मात्र आता डीए 50 टक्के करण्यात आला आहे, त्यामुळे डीए 25,000 रुपये होणार आहे. म्हणजे सदर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोन हजार रुपयांनी वाढला आहे.