7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर वाढीचा लाभ दिला जाणार आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असे सांगितले जात आहे. खरतर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्ष 2023 खूपच आनंदाचे ठरले आहे. यंदा सरकारी कर्मचाऱ्यांना 8 टक्क्यांची महागाई भत्ता वाढ मिळाली आहे. यामुळे त्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान आता हे चालू वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची आणखी एक भेटणार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता दिला जात आहे. यामध्ये आता जानेवारी 2024 पासून आणखी चार टक्के वाढ होणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाणार आहे.
एवढेच नाही तर महागाई भत्ता 50% क्रॉस झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता देखील वाढवला जाणार आहे. घरभाडे भत्त्यात म्हणजेच एचआरए मध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे.
म्हणजेच येणारे नवीन वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी खास राहणार आहे. यासोबतच नवीन वर्षामध्ये फिटमेंट फॅक्टर मध्ये देखील वाढ केली जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
फिटमेंट फॅक्टर किती वाढणार ?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट एवढा फिटमेंट फॅक्टर लागू आहे. पण आता नवीन वर्षात हा फॅक्टर 3.68 एवढा केला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ होणार आहे. सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 18000 रुपये एवढा मूळ पगार मिळत आहे.
मात्र जेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढेल तेव्हा किमान मूळ पगार देखील वाढणार आहे. यामध्ये तब्बल आठ हजार रुपयांची वाढ होणार असून किमान मूळ पगार 26000 वर जाणार आहे.
पण याबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये यामध्ये लवकरच सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.