आताची सर्वात मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता देणेबाबतचा अधिकृत शासन निर्णय ‘या’ दिवशी निर्गमित होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची आचारसहिता लागू होण्यापूर्वी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्क्यांवरून 50 टक्के एवढा झाला आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला आहे.

मात्र महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला नाही. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र आता लवकरच आचारसंहिता संपणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

कधी निघणार जीआर ?

मीडिया रिपोर्टनुसार, राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे. सध्या त्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे. परंतु यामध्ये चार टक्क्यांची वाढ होणार आहे, अर्थातच महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा धर्तीवर 50 टक्के एवढा होणार आहे. जानेवारी 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे.

याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरचं घेतला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाईल.

या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्याबाबतच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होईल. यानंतर मग राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार निर्गमित करेल असे बोलले जात आहे.

म्हणजेच जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी केला जाणार आहे. निश्चितच असे झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार

DA 50% करण्याबाबतचा जीआर जूनच्या शेवटच्या महिन्यात जारी केला जाणार आहे. म्हणजे महागाई भत्ता वाढीचा लाभ जून महिन्याच्या पगारा सोबतच मिळणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल.

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जानेवारी 2024 पासून 50 टक्के होणार आहे. यामुळे महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. जानेवारी ते मे या कालावधील महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

Leave a Comment