7th Pay Commission : लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आणखी 2 टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. यानंतर चार जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जून महिन्यात नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करणार आहे. दरम्यान जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वी अर्थातच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करून कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मार्च 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% करण्यात आला आहे.
याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. अर्थातच त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी देखील सरकार महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते, असे बोलले जात आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे आणि यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५४ वर पोहोचणार आहे.ही महागाई भत्ता वाढत जुलै 2024 पासून लागू केली जाणार आहे.
मात्र याचा निर्णय सप्टेंबर 2024 मध्ये घेतला जाईल अशी शक्यता आहे. अर्थात सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 54% करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पण ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू केली जाणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यावेळी महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे. त्यावेळी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये महागाई भत्ता 50 टक्क्यावर पोहोचला असल्याने महागाई भत्त्याची रक्कम आता मूळ पगारात जोडली जाऊ शकते असा दावा केला जात आहे. महागाई भत्त्याची रक्कम मूळ पगारात जोडून महागाई भत्ता शून्य केला जाईल असे म्हटले जात आहे.
जर असा निर्णय सरकारने घेतला तर यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. तथापि याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे सरकार महागाई भत्ता संदर्भात काय निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.