पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता पुणे ते दौंड प्रवास फक्त 60 मिनिटात; सुरू झाली विशेष ट्रेन, ‘या’ 10 स्टेशनवर थांबणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी पुणे ते दौंड दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. खरे तर पुणे ते दौंड असा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच आहे. या मार्गावर दैनंदिन प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परिणामी पुणे ते दौंड दरम्यान लोकल चालवली गेली पाहिजे अशी मागणी प्रवाशांची आहे. दरम्यान प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारपासून या मार्गावर इलेक्ट्रिक लोकल सुरु झाली आहे. मात्र ही गाडी तात्पुरती सुरू झाली आहे. त्याचे झाले असे की पुणे ते दौंड या मार्गावर धावणारी डेमू ट्रेन दुरुस्तीसाठी माटुंगा येथे पाठवण्यात आली आहे.

डेमू ट्रेन दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असल्याने या मार्गावर भुसावळ येथून मागवलेली इलेक्ट्रिक लोकल सोमवारपासून सुरू झाली आहे. ही इलेक्ट्रिक लोकल आता जोपर्यंत या मार्गावरील डेमू ट्रेन दुरुस्त होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर लोकल ट्रेन सुरू झाली पाहिजे, ही प्रवाशांची मागणी तात्पुरती का होईना पण पूर्ण झाली आहे एवढे नक्की. दरम्यान या मार्गावर भुसावळ येथून मागवलेली इलेक्ट्रिक लोकल नियमित करावी जेणेकरून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी मागणी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे.

विशेष म्हणजे रेल्वे देखील ही इलेक्ट्रिक लोकल पुण्यातच राहावी यासाठी प्रयत्न करणार आहे. यामुळे जर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे हे प्रयत्न सक्सेसफुल ठरलेत तर पुणे ते दौंड हा प्रवास भविष्यातही सोयीचा होणार आहे.

खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी दौंडसह आजूबाजूचा बहुतांशी रेल्वेचा भाग पुणे विभागात समाविष्ट करण्यात आला आहे. सोलापूर विभागातील दौंड पुणे विभागात समाविष्ट झाले असल्याने दौंडला उपनगराचा दर्जा मिळेल आणि या मार्गावर लोकल ट्रेन सुरू होईल अशी आशा होती. मात्र प्रवाशांची ही इच्छा अजून पूर्ण झालेली नाही.

मात्र या मार्गावर सोमवारपासून तात्पुरती इलेक्ट्रिक लोकल सुरू झाली आहे. ही इलेक्ट्रिक लोकल जोपर्यंत या मार्गावरील डेमू रिपेअर होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे पुण्यातील प्रवासी आणि प्रवासी संघटनांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ही गाडी दौंड – पुणे दरम्यान आठवड्यातून सात दिवस चालवली जात आहे. ही ट्रेन दौंड जंक्शन येथून 05:02 वाजता सुटते आणि 6:32 ला पुणे जंक्शनला पोहचते. म्हणजे पुणे ते दौंड हा प्रवास फक्त दीड तासात पूर्ण होत आहे.

ही गाडी या मार्गावरील 11 स्थानकावर थांबा घेते. पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, येवत, उरुळी, लोणी, मांजरी बुद्रुक, हडपसर या स्थानकावर ही गाडी सर्वाधिक वेळ थांबते. यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांना या ट्रेनचा मोठा फायदा होत आहे.

Leave a Comment