……तर शेतजमीन विकली तरी टॅक्स द्यावा लागतो ? आयकर विभागाचे ‘हे’ नियम तुम्हाला माहितचं असायला हवेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Rule : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आज आपण शेत जमीन विकली तर टॅक्स द्यावा लागतो का ? याबाबत आयकर विभागाचे काय नियम आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. खरेतर घर, फ्लॅट, NA प्लॉट किंवा दुकान यांसारखी मालमत्ता विक्री केल्यानंतर जी काही रक्कम प्राप्त होते, जे उत्पन्न मिळते ते उत्पन्न भांडवली नफा करासाठी पात्र असते.

म्हणजे अशा उत्पन्नावर कर भरावा लागतो. अनेकांना असे वाटते की, शेत जमीन विक्री केल्यानंतर कर भरण्याची काही आवश्यकता नाही. मात्र असे मुळीच नाही. हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

कारण की शेत जमिनीची विक्री केल्यानंतर देखील टॅक्स अर्थातच भांडवली नफा कर भरावा लागतो. मात्र सर्वच शेत जमिनीच्या विक्रीवर हा कर भरावा लागत नाही. काही विशिष्ट भागातील शेत जमिनीच्या विक्रीवरचं भांडवली नफा कर आकारला जात असतो.

आता आपण कोणत्या शेत जमिनीच्या विक्रीवर भांडवली नफा कर आकारला जातो आणि कोणत्या शेत जमिनीच्या विक्रीवर भांडवली नफा कर आकारला जात नाही यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आयकर कायदा काय सांगतो ?

आयकर कायद्यानुसार तुमची शेतजमीन नगरपालिका, अधिसूचित क्षेत्र समिती, नगर क्षेत्र समिती किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अंतर्गत असेल आणि तेथील लोकसंख्या १० हजार किंवा त्याहून अधिक असेल तर ती जमीन प्राप्तिकर कायद्यानुसार शेतजमीन मानली जाणार नाही.

महापालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या १० हजाराहून अधिक परंतु एक लाखापर्यंत असेल, तर दोन किलोमीटरच्या परिघात येणारी जमीन शेतजमीन म्हणून गणली जाणार नाही.

महापालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त परंतु १० लाखांपर्यंत असेल, तर आजूबाजूच्या सहा किलोमीटरच्या त्रिज्येतील क्षेत्र ही शेतजमीन मानली जाणार नाही.

नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त असल्यास आठ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात असलेली जमीन शेतजमीन म्हणून गणली जाणार नाही.
जर तुमची जमीन वर नमूद केलेल्या भागात असेल तर ती शेतजमीन म्हणून गणली जाणार नाही.

म्हणजेच अशा जमिनीच्या विक्रीवर तुम्हाला कर भरावा लागणार आहे. मात्र जर तुमची शेतजमीन वर नमूद भागामध्ये नसेल तर ती शेतजमीन म्हणूनचं ग्राह्य धरली जाणार आहे आणि अशा जमिनीवर कर आकारला जाणार नाही.

थोडक्यात सांगायचं झालं तर शहरी भागात जी शेत जमीन असते त्याच्या विक्रीवर देखील कर आकारला जातो. मात्र जी शेतजमीन ग्रामीण भागात असते तिच्या विक्रीवर कर लागत नाही.

Leave a Comment