7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी निश्चितच फायद्याची ठरणार आहे. कारण की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे.दरम्यान आज आपण हे तीन आर्थिक लाभ नेमके कोणते आहेत आणि याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महागाई भत्ता वाढीचा लाभ
जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
तो म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% केला आहे. विशेष बाब म्हणजे की महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. तसेच याचा रोख लाभ हा मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
महागाई भत्ता फरकाचा लाभ
महागाई भत्ता वाढ ही जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे. यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना या पगारा सोबत वितरित होणार आहे. अर्थातच कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा चांगला वजनदार बनणार आहे.
घरभाडे भत्ताही वाढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 टक्के होईल तेव्हा घरभाडे होता देखील वाढवला जाणार असे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 50% झाला असल्याने त्यांचा घर भाडे फक्त देखील वाढला आहे.
त्यांचा घर भाडे भत्ता हा शहरानुसार 1% पासून ते 3% पर्यंत वाढला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारी कर्मचाऱ्यांचा घर भाडे फक्त हा शहरानुसार एक्स, वाय आणि झेड या कॅटेगिरी मध्ये डिवाइड करण्यात आला आहे.
आधी एक्स कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 27%, वाय कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 18% आणि झेड कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना 9% एवढा घर भाडे भत्ता दिला जात होता.
आता मात्र यामध्ये वाढ झाली असून एक्स कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 30, कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 20 आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढा घरभाडे भत्ता दिला जाणार आहे.
मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच
खरेतर, मार्च महिन्याचे वेतन हे एप्रिल महिन्यात होणार होते. परंतु सणासुदीचा हंगाम पाहता शासनाने या महिन्याचे वेतन म्हणजेच मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यानुसार 30 किंवा 31 मार्चला सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांचे वेतन, महागाई भत्ता वाढ, महागाई भत्ता फरक आणि घरभाडे भत्ता वाढीसह मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.