महागाई भत्ता 50 टक्के झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढलेत ? पहा संपूर्ण यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान मतदानाचा हा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी अर्थातच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.

सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला. अर्थातच महागाई भत्ता म्हणजेच डीए चार टक्क्यांनी वाढवला. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारात चांगली वाढ झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या दिवसांतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, या वाढीव महागाई भत्ता सरकारने १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

या पगारांसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळाली. एवढेच नाही तर आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतरही अनेक भत्त्यांमध्ये लवकरच वाढ होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) 2 एप्रिल 2024 ला याबाबतचे एक परिपत्रक अर्थातच शासकीय मेमोरँडम काढले आहे. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध भत्ते सुधारित करण्यात आले आहेत तसेच याचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या सूचना सुद्धा जारी झाल्या आहेत.

2016 मध्ये लागू करण्यात आलेल्या सातवा वेतन आयोग अंतर्गत शिफारशींचे पालन करून रेल्वे कर्मचारी, नागरी संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ऑफर केलेल्या विविध भत्याचे परीक्षण केले.

दरम्यान आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते सुधारित करण्यात आले आहेत ? या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% झाल्यानंतर इतर कोणते भत्ते वाढवले गेले आहेत ते थोडक्यात समजून घेणार आहोत.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढले 

महागाई भत्ता

घर भाडे भत्ता

वाहतूक भत्ता

बाल शिक्षण भत्ता (चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स)

सरकारी दौऱ्यादरम्यानचा प्रवास भत्ता

प्रतिनियुक्ती भत्ता

पेन्शनधारकांसाठी निश्चित वैद्यकीय भत्ता

उच्च पात्रता भत्ता

लीव ट्रॅव्हल इनकॅशमेंट

लीव इनकॅशमेंट

नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स

Leave a Comment