7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. आता, मात्र यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे.
त्यानुसार आता महागाई भत्ता 50 टक्के एवढा झाला आहे. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. याचा रोख लाभ मात्र मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात मिळेल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे.
यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. महागाई भत्ता वाढ आणि थकबाकी असा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय घर भाडे भत्ता देखील वाढणार आहे. घर भाडे भत्त्यात कर्मचारी वास्तव्याला असलेल्या शहरानुसार वाढ केली जाणार आहे.
घर भाडे भत्त्यात एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यापर्यंत वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील कोणत्या शहरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती टक्के घरभाडे भत्ता मिळणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढला HRA
केंद्र सरकारने घर भाडे भत्त्यासाठी म्हणजे HRA साठी प्रत्येक शहराची X,Y,Z या श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. यानुसार आत्तापर्यंत X श्रेणीच्या शहरातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक 27 टक्के एचआरए मिळत होता. Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 18% एचआरए मिळत होता.
Z श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा घर भाडे भत्ता दिला जात होता. आता मात्र एक्स श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 30 टक्के, वाय श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना २० टक्के आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना 10% एवढा घर भाडे भत्ता दिला जाणार आहे.
अशा तऱ्हेने घर भाडे भत्त्यात एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आता आपण एक्स, वाय आणि झेड श्रेणीमध्ये कोण कोणते शहर येतात हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
X श्रेणी मध्ये येणाऱ्या शहरांची यादी : दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकाता हे X श्रेणीत येतात.
Y श्रेणीमध्ये येणाऱ्या शहरांची यादी : पाटणा, लखनौ, विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा, गुवाहाटी, चंदीगड, रायपूर, राजकोट, जामनगर, वडोदरा, सुरत, फरीदाबाद, गाझियाबाद, गुडगाव, नोएडा, रांची, जम्मू, श्रीनगर, ग्वाल्हेर, इंदूर, भोपाळ, जबलपूर, उज्जैन, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली, सोलापूर, नाशिक, नांदेड, भिवडी, अमरावती, कटक, भुवनेश्वर, राउरकेला, अमृतसर, जालंधर, लुधियाना, बिकानेर, जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, मुरादाबाद, मेरैली , अलीगढ, आग्रा, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, गोरखपूर, फिरोजाबाद, झाशी, वाराणसी आणि सहारनपूर Y श्रेणीत येतात.
Z श्रेणीत समाविष्ट असलेल्या शहरांची यादी : Z कॅटेगरीमध्ये अशा शहरांची नावे येतात जी X आणि Y मध्ये येत नाहीत.