मुंबई-अहमदाबादसहित ‘या’ 10 मार्गांवर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ! ‘ही’ महत्त्वाची शहरे Vande Bharat Train ने जोडली जाणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Vande Bharat Train Latest News : वंदे भारत एक्सप्रेस या देशातील संपूर्ण भारतीय बनावटीच्या हायस्पीड ट्रेन संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. खरेतर, येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. खासदारकीच्या निवडणुका पाहता केंद्रातील मोदी सरकार गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. गॅस सिलेंडरचे दर नुकतेच कमी झाले आहेत.अशातच आता देशातील रेल्वे प्रवाशांना खुश करण्यासाठी दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरू असून आज अर्थातच 12 मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत.

यामध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या हायस्पीड ट्रेनचा देखील समावेश राहणार आहे. या दहा नवीन एक्सप्रेसमुळे आता देशातील वंदे भारत एक्सप्रेसच्या रूटची संख्या 51 वर पोहोचणार आहे.

शा परिस्थितीत, आता आपण आज कोणत्या दहा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या दहा मार्गांवर धावणार वंदे भारत ?

रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद, विशाखापट्टणम-सिकंदराबाद, म्हैसूर-चेन्नई, पाटणा-लखनौ, न्यू-जलपाईगुडी-पटना, पुरी-विशाखापट्टणम, लखनौ-डेहराडून, कलबुर्गी-बेंगळुरू, रांची-वाराणसी, खजुराहो-दिल्ली या दहा मार्गावर आज वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.

या गाडयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यासह अहमदाबाद-जामनगर वंदे भारत द्वारकापर्यंत विस्तारित केली जाणार आहे. अजमेर-दिल्ली सराई रोहिल्ला वंदे भारतचा विस्तार चंदीगडपर्यंत केला जाणार आहे.

गोरखपूर-लखनौ वंदे भारतचा विस्तार प्रयागराजपर्यंत केला जाणार आहे आणि तिरुवनंतपुरम-कासारगोड वंदे भारत मंगळुरूपर्यंत विस्तारित केली जाणार आहे.

मुंबईला मिळणार सहावी गाडी

सध्या देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला पाच वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर ही ट्रेन अहमदाबाद मार्गेच धावत आहे. अर्थातच मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद यादरम्यान धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. या गाडीमुळे मुंबईमधील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 6 वर पोहोचणार आहे.

Leave a Comment