7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर केलेला आहे.
जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला असून मार्च महिन्याच्या पगारासोबतच याचा रोख लाभ देखील मिळाला आहे.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा धरतीवर वाढवला आहे. मात्र अद्याप महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला नाही.
त्यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तथा पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार हाचं मोठा सवाल सदर मंडळीच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच मंडळीच्या महागाई भत्ता वाढीव संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या सदर नोकरदार मंडळीला महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार या संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे.
केव्हा मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तथा पेन्शन धारकांना 46% या दराने महागाई भत्ता दिला जात आहे. हा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून मिळत आहे.
आता मात्र या मंडळीला जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के होणार आहे. याबाबतचा निर्णय सध्या आचारसंहिता सुरू असल्याने रखडला आहे.
परंतु चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्याची शासकीय कर्मचाऱ्यांचा तथा पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 46% वरून 50% करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.
याचा अधिकृत शासन निर्णय पुढील महिन्याचा अर्थात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निघणार अशी दाट शक्यता एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या सदर नोकरदार मंडळीला महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. वाढीव महागाई भत्ता आणि जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम जून महिन्याच्या पगारांसोबत मिळण्याची शक्यता आहे.