आनंदाची बातमी ! ‘या’ प्रायव्हेट सेक्टरमधील बड्या बँकेने FD व्याजदरात केली सुधारणा, नवीन दर लगेच चेक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : जर तुमचाही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील एका बड्या बँकेने मे महिन्यात अगदी सुरवातीलाच एफडी व्याजदर सुधारित केले आहेत.

आरबीएल या प्रायव्हेट बँकेने आपले फिक्स डिपॉझिटचे व्याजदर रिवाईज केले असून हे नवीन व्याजदर एक मे 2024 पासून लागू राहणार असल्याची माहिती बँकेच्या माध्यमातून समोर आली आहे. बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या फिक्स डिपॉझिटसाठीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे.

यामुळे आगामी काळात एफडी करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आणि त्यांना अधिकचे रिटर्न मिळणार अशी आशा आहे. दरम्यान आता आपण आरबीएल बँकेचे हे सुधारित व्याजदर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरंतर आरबीएल बँक सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीपर्यंतची एफडी ऑफर करत आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून या कालावधीच्या एफडीवर चांगले इंटरेस्ट रेट दिले जात आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँक सामान्य ग्राहकांना कमाल 8% एवढे व्याजदर देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी 8.50% एवढे इंटरेस्ट रेट दिले जात आहे. आता आपण बँकेचे नवीन सुधारित दर कसे आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.

सात दिवसांपासून ते 14 दिवसांची FD : सामान्य ग्राहकांना 3.50% आणि जेष्ठ नागरिकांना चार टक्के.
पंधरा दिवसांपासून ते 45 दिवस : सामान्य ग्राहक चार टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.50%
४६ दिवस ते ९० दिवस : ४.५० टक्के सर्वसामान्यांसाठी; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५ टक्के
91 दिवस ते 180 दिवस : सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५ टक्के
181 दिवस ते 240 दिवस: सर्वसामान्यांसाठी 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
241 दिवस ते 364 दिवस: सर्वसामान्यांसाठी 6.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५५ टक्के
365 दिवस ते 452 दिवस: सर्वसामान्यांसाठी 7.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
15 महिने : सर्वसामान्यांसाठी 7.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.३० टक्के
15 महिने 1 दिवस ते 725 दिवस: सामान्य लोकांसाठी – 8 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.५० टक्के
725 दिवस : सर्वसामान्यांसाठी 7.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.०० टक्के
5 वर्षांची FD – 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.60 टक्के

Leave a Comment