सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोग आणि पगारात झालेली वाढ, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशभर नवीन वेतन आयोगाची अर्थातच आठव्या वेतन आयोगाची चर्चा पाहायला मिळत आहे. केंद्रातील सरकारने जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आठवा वेतन आयोग लागू केला जाईल असे म्हटले जात होते.

मात्र केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोग संदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. मध्यंतरी मात्र केंद्रातील सरकारने सध्या स्थितीला आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते. केंद्रीय वित्तमंत्री आणि वित्त राज्यमंत्री महोदय यांनी स्वतः ही माहिती संसदेत दिली होती.

पण, सरकारी कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी आठवा वेतन आयोग लागू होईल अशी आशा होती. मात्र असे काही घडले नाही. यामुळे आठवा वेतन आयोगासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत असून शासनाविरोधात नाराजी देखील आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये जेव्हा केंद्रात नवीन सरकार स्थापित होईल त्यावेळी आठवा वेतन आयोगाबाबत निर्णय घेतला जाईल असा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण आत्तापर्यंत लागू झालेले वेतन आयोग आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ झाली आहे या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पहिला वेतन आयोग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला वेतन आयोग लागू झाला. 1947 मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाला होता त्यावेळी पगारात 40 टक्के एवढी वाढ झाली होती.

दुसरा वेतन आयोग : 1959 मध्ये दुसरा वेतन आयोग लागू झाला, त्यावेळी पगारात तब्बल 50 टक्के एवढी वाढ झाली होती.

तिसरा वेतन आयोग : पुढे 1973 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन आयोग लागू करण्यात आला, त्यावेळी पगारात फक्त 25 टक्के एवढी वाढ झाली होती.

4था वेतन आयोग : यानंतर, 1986 मध्ये चौथा वेतन आयोग लागू करण्यात आला, त्यावेळी पगारात 40 टक्के एवढी वाढ करण्यात आली.

पाचवा वेतन आयोग : 1996 मध्ये पाचवा वेतन आयोग लागू झाला, त्यावेळी पगारात 35 टक्के एवढी वाढ झाली.

सहावा वेतन आयोग : सहावा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर हा वेतन आयोग 2006 मध्ये लागू झाला आणि त्यावेळी पगारात चाळीस टक्के एवढी वाढ करण्यात आली.

सातवा वेतन आयोग : 7th Pay Commission हा 2016 मध्ये लागू झाला आहे, सातवा वेतन आयोग लागू करताना पगारात फक्त 14 टक्के एवढी वाढ देण्यात आली आहे. सध्या स्थितीला सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत पगार मिळत आहे.

आठवा वेतन आयोग कधी येणार?

वेतन आयोगाचा आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो असे दिसते. यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. नवीन आठवा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे.

Leave a Comment